महिलांसाठी खूश खबर या महिलांना मिळणार 6000रु ते कसे आणि कोणत्या महिला ठरतील पात्र.
Government Scheme For Women : शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. कष्टकरी शेतमजुरांसाठी, असंघटित कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच महिलांसाठी देखील शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. केंद्र शासन आणि राज्य शासन आपल्या स्तरावर या योजना राबवत असते.
यामध्ये नुकतेच महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी एसटीचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून 50% तिकीट दरात सवलत देण्याची योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय केंद्र शासनाकडून देखील महिलांसाठी एक विशेष योजना राबवली जाते. ही योजना विवाहित महिलांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून विवाहित महिलांना सहा हजार रुपयाचा लाभ मोदी सरकारच्या माध्यमातून दिला जातो.
या योजनेचे नाव पीएम मातृत्व वंदना योजना असे असून या योजनेचा लाभ देशभरातील महिलांना दिला जात आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मदत म्हणून सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. गर्भवती महिला आणि तीचे अपत्य यांच्या आरोग्यासाठी हा लाभ प्रामुख्याने शासनाकडून दिला जातो. खरं पाहता भारत देश तेजीने विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे मार्गक्रमण करत आहे.
मात्र तरीही देशात कुपोषण ही मोठी समस्या आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून गरीब महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पैशातून त्या संबंधित गर्भवती महिलेला आपले व आपल्या बाळाच्या आरोग्याची आणि आहाराची व्यवस्था करण्यास मदत होणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील गर्भवती महिलांना 6000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना एकूण चार टप्प्यात निधीचे वाटप केले जाते. यामध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जातात. यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2000 आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 दिले जातात. योजनेअंतर्गत चौथ्या टप्प्यात दिले जाणारे हजार रुपये बाळाच्या जन्मानंतर दिले जातात.
निश्चितच या योजनेचा फायदा गर्भवती महिला आणि नवजात बालकांना होतो. यामुळे गर्भवती महिलांना आपल्या आहाराचे व्यवस्थापन, आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते. शिवाय गर्भवती महिलांना प्रसुती नंतर एक हजार रुपये मिळतात यामुळे संबंधित लाभार्थी गर्भवती महिलांच्या बालकाला देखील यामुळे फायदा होतो. कुपोषण दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना निश्चितच महिलांसाठी कल्याणकारी योजना आहे.
- ही योजना 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली केंद्राची एक महत्वाची योजना आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र सरकार एकूण सहा हजार रुपयाचा लाभ देते.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गर्भवती महिलेचे वय किमान 19 वर्ष असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने गर्भवती महिलांना अर्ज सादर करावा लागतो.
- या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट दिली जाऊ शकते.
- योजने संदर्भात काही अडचण येत असल्यास 7998799804 या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधता येतो.
0 टिप्पण्या