कोण आहे "महेश मोटे "? झेल ते motivational speaker.
दैनंदिन जीवनात आपण सोशल मिडिया चा वापर करतो. रोज किती तरी instagram reels scroll करतो फक्त ते टाइमपास म्हणून पण असे काही लोक आहेत की ज्यांचे आयुष्य सोशलमीडिया मुळे बदलून गेले .
प्रत्येकाला बोलायला आवडते परंतु आपण हा विचार केला आहे का?केवळ आपल्या बोलण्याच्या मार्गाने पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते.शिवाय आपल्या विचाराने इतरांचे आयुष्य बदलून जाते होय, असे काही "motivation speaker" आहेत जे आपल्या शब्दाची जादू इतरांवर पसरवतात.
ते विचार ऐकून लोकांना निराशेच्या अंधारातून बाहेरच्या प्रकाश नवीन कार्य करण्यास मदत होते.असा एक 'मोटिवेशन स्पीकर' आपल्या शब्दां लोकाना प्रभावित करत आहे. महेश मोटे अस या तरुणाचे नाव आहे.
महेश मोटे हा 25 वर्षीय तरुण मूळचा पंढरपूर तालुक्यातील बाभुळगावचा रहिवासी डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअर शिक्षण घेतलेल्या या युवकाला बॉलीवूडचं आकर्षण होत त्यानं मुंबई गाठली. पण त्याला यश आले नाही आले. पुढे तो कामानिमित्त परदेशात गेला.
तेथे त्याला अनेक वाईट सवयी आणि व्यसनं लागली . तिथेच त्याच्या हातून काही गुन्हे ही घडले त्यामुळे तो बरेच दिवस तिथल्या झेल मध्येही होता. झेल मधून सुटल्यावर पुण्यात आला. पुण्यात आल्यावर ओला उबेर गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. शरीर असलेल्या महेशला व्यायामाची प्रचंड आवड. सध्या तो पुण्यात हीट ८० या अमेरिकन कंपनीत न्यूट्रीशियन हेल्थ कोच म्हणून काम करतोय. महेशसोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेरणदायी विचार एक मिनिटाच्या व्हिडिओद्वारे मांडत असतो. तो खरोखर कोणतेही भाषण देत नाही, त्याऐवजी प्रथम तो लोकांचे लक्ष वेधून घेतो. तो फक्त गंभीर गोष्टी बोलत नाही.
त्याऐवजी काही गंभीर गोष्टी अशा प्रकारे सादर करतो की जे ऐकत असेल त्याला स्वतः ता त्यांच्याशी जोडलेले वाटेल. यासाठी तो काही उदाहरणे आणि कधीकधी काही हलके विनोद सांगतो. समाज, ठिकाण आणि देशातील लोकांची संस्कृती जीवनशैली इत्यादी विषयांवरील आधारित त्याचे व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेताहेत.
● अशी झाली सुरुवात
लॉकडाऊन दरम्यान, एकदिवस तो सहज फेसबुकवर एका
विषयावर लाईव्ह बोलत होता. त्याचे बोलणे त्याच्या मित्रांना आवडले. त्यानंतर त्याने ठरविले की, आपण यांचे छोटे छोटे टिक टॉक व्हिडिओ बनवायचे. त्याचे हे व्हिडिओ हिट ठरले. झटपट लाखभर फॉलोचा टप्पा मिलियनपत गाठला.मनोरंजन म्हणून वापरल्या जाणान्या टिक टॉक मुळे त्याचे आयुष्य बदलून गेले होते. अवध्या एक मिनिटांचे टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असे. मात्र वा अपवर बंदी आल्याने तो आता इतर सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करत लोकांपुढे येत असतो.
अफाट माहिती....
महेशकडे अनेक विषयांवर बोलण्यासाठी भरपूर माहिती आहे.
| यासाठी तो खास तयारी करतो. सॉक्रेटिस, जॉर्ज हेगल, प्लुटो
| यांसारख्या जगभरातील फिलोसॉफरची पुस्तके आणि त्यांचे चरित्र वाचत असतो. प्रत्येकवेळी नवीनपणा, उत्साह, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, विश्वासार्हता बोलण्यातला आत्मविश्वास यासारखे त्याचे गुण प्रभावी करतात. लोकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण | करण्याचे काम तो करत आहेत. त्याचे विचार ऐकून लोक त्यांच्या यशाकडे वाटचाल करू शकतील यात शंका नाही.
0 टिप्पण्या