Disqus Shortname

6/recent/ticker-posts

खासदार साहेब करणार चंद्रा बरोबर लग्न | amruta khanvilkar and amol kolhe marrage news

 

  • Amol Kolhe on marriage with Amruta Khanvilkar : अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीमधील बातमी शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


Amol Kolhe: अमृता खानविलकरबरोबर लग्न करणार?


खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे लक्ष असते. काल (1 एप्रिल) रोजी अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.



खासदार अमोल कोल्हे यांनी लिहलेली पोस्ट काय आहे?अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्रामधील बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार असल्याचं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे.या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, 'हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!' अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.


https://mhnewsmarathi24.blogspot.com/2023/04/amruta-khanvilkar-and-amol-kolhe.html



https://www.instagram.com/p/Cqf5Fz1pGmP/?igshid=YmMyMTA2M2Y=

अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट केली आहे. अमृता खानविलकरने 'हे काय आहे', अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यानी अमोल कोल्हेंच्या पोस्टवर कमेंट केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी लिहलेली पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधरित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 840K इतके फॉलोवर्स आहेत.अमोल कोल्हे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

https://mhnewsmarathi24.blogspot.com/2023/04/amruta-khanvilkar-and-amol-kolhe.html








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या