नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात NEET परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेशद्वार मानले जाते. NEET ची काठीण्य पातळी खूप उंच असते, त्यामुळे भल्या भल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देताना घाम फुटतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत आहोत असे पर्याय जे तुम्हाला नीटशिवाय वैद्यकीय क्षेत्राचा मार्ग मोकळा करून देतात.बारावीनंतर असे बरेच वैद्यकीय कोर्स आहेत ज्यांना नीटची आवश्यकता नाही. या लेखात अशा काही अभ्यासक्रमांविषयी जाणून घेऊ...
आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा ना देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
B.Sc in Cardiovascular Technology- हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर आयुष्याला चांगले करिअरचे पर्याय मिळतात आणि पगारही चांगला मिळतो.
B.Sc in Nutrition- हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स केल्यानंतर वर्षाला तीन लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
बीएससी इन जेनेटिक्स- जेनेटिक्समध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
बायोमेडिकलमध्ये B.Sc- बायोमेडिकलचा हा 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर, व्यक्तीला वार्षिक 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
सायबर फॉरेन्सिकमध्ये B.Sc- हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेतन 5 ते 7 लाखांपर्यंत असू शकते.
बॅचलर इन फिजिओथेरपी- हा चार वर्षांचा कोर्स आहे, जो पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 5 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.
0 टिप्पण्या