Disqus Shortname

6/recent/ticker-posts

IPL 2023 : Mumbai Indians विरुद्ध मॅचआधी RCB ला झटका, ‘त्या’ तिघांवर खर्च केले 29.5 कोटी रुपये report


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्याच्या एक दिवस आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) दुहेरी धक्का बसला आहे.


IPL 2023: Bad news for Bangalore team.. Injured Rs 3.20 crore player.. Out of IPL?


IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB चा पहिला सामना होणार आहे. त्यांना कडव आव्हान मिळणार हे स्वाभाविक आहे. 1 एप्रिलला दोन्ही टीम्समध्ये पहिला सामना होणार आहे.


IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सीजनची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. या टुर्नामेंटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम एक एप्रिलला आपला पहिला सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB चा पहिला सामना होणार आहे. त्यांना कडव आव्हान मिळणार हे स्वाभाविक आहे. या मॅचआधी आरसीबीचे तीन खेळाडू पहिल्या मॅचमधून आऊट झाले आहेत. हे तिन्ही प्लेयर्स आरसीबीची ताकत आहेत. फ्रेंचायजीने त्यांच्यावर 29.5 कोटी रुपये खर्च केले आहेत.

ग्लेन मॅक्सवेल, जोश हेजलवुड आणि वानेंदु हसारंगा आरसीबीकडून पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाहीत. हेजलवूड आणि हसारंगा आणखी काही सामन्यांना मुकू शकतात. असं का होतय? ते जाणून घ्या.

मॅक्सवेल बाहेर का?

ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे फिट नाहीय. मागच्यावर्षी एका बर्थ डे पार्टीमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायावर ऑपरेशन झालं. मॅक्सवेलने अलीकडेच भारताविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये पुनरागमन केलं. पण त्यावेळी तो पूर्णपणे फिट नसल्याचं लक्षात आलं. मॅक्सवेल आरसीबीच्या कॅम्पमध्ये स्वत:ला 100 टक्के फिट बनवण्याचा प्रयत्न करतोय. ग्लेन मॅक्सवेलची सॅलरी 11 कोटी रुपये आहे.

प्रमुख गोलंदाज नाही खेळणार

आरसीबीच्या गोलंदाजीचा कणा असलेला जोश हेजलवूड सुद्धा काही सामन्यात खेळणार नाहीय. हेजलवूड अजूनपर्यंत भारताल आलेला नाही. हेजलवुडच्या दुखापतीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिके दरम्यान हेजलवूडला दुखापत झाली होती. बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्येही तो खेळू शकला नाही. हेजलवूडला आरसीबीने 7.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. या खेळाडूच काही सामन्यात न खेळणं आरसीबीला महाग पडू शकतं.

वानेंदु हसारंगा 3 मॅचना मुकणार?

लेग स्पिनर वानेंदु हसारंगा सुद्धा काही सामन्यात खेळणार नाही. 10.75 कोटींना विकत घेतलेला हा खेळाडू न्यूझीलंडमध्ये वनडे सीरीज खेळतोय. त्यानंतर तो टी 20 सीरीज खेळणार आहे. श्रीलंकेची ही सीरीज 8 एप्रिलला संपणार आहे. आरसीबीचा दुसरा सामना 6 एप्रिलला होणार आहे. 10 एप्रिलला तिसरा सामना आहे. या तिन्ही सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या